
पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारी वातानुकूलित (एसी) लोकलच्या 13 फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्या. त्या जागी नॉन-एसी लोकल चालवण्यात आल्या. उष्णतेत मोठी वाढ झाली असतानाच एसी लोकल सेवेचा गोंधळ झाला. त्यामुळे नियमित पासधारक प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. त्यांना उकाड्याचा त्रास सहन करीत प्रवास करावा लागला. मुंबईत तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एसी लोकल गाड्यांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. अशातच बुधवारी एसी लोकलच्या 13 फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

























































