
– आपल्याला कोणी चेक दिला. बँकेत टाकल्यानंतर तो चेक दोन ते तीन दिवसांनंतर परत आला तर काय करावे.
– अशा चेकला चेक बाऊन्स होणे म्हणतात. बँकेने हा चेक वटवण्यासाठी नकार दिला आहे, असा त्याचा अर्थ होतो.
– जर तुम्हाला दिलेला चेक बाऊन्स झाला असेल, तर कायदेशीर सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कायदेशीर सल्लागाराची मदत घ्या.
– अपुरा निधी खात्यात असेल, स्वाक्षरी बँकेतील खात्यातील स्वाक्षरीशी जुळत नसणे हेसुद्धा एक कारण त्यामागे असू शकते.
– चेक बाऊन्स झाल्यानंतर चेक देणाऱया व्यक्तीला 30 दिवसांच्या आत कायदेशीर नोटीस पाठवणे आवश्यक आहे.