फ्लाॅवरमधील किड काढण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायला हव्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाजारात आता मोठ्या प्रमाणात फ्लाॅवरची भाजी दिसून येत आहे. परंतु अनेकजण फ्लाॅवर खाण्यास नाक मुरडतात. कारण फ्लाॅवरमध्ये असणारे किडे साफ करणं एक डोकेदुखी असते. फ्लाॅवरपासून आपण विविध पदार्थ बनवू शकतो. पराठ्यांपासून ते भजीपर्यंत आपण विविध पदार्थ फ्लाॅवरपासून बनवून खाऊ शकतो. फ्लाॅवर हा आपल्या जिभेच्या चवीसाठी उत्तम आहेच. शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फ्लाॅवर फार उपयुक्त मानला जातो.

फ्लाॅवरमध्ये व्हिटॅमिन सी, के आणि फोलेट असते. तसेच फायबरचा उत्तम स्त्रोत फायबरमध्ये असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कमी कॅलरीजमुळे फ्लाॅवर वजन कमी करण्यासाठीही उत्तम मानला जातो.

बेकिंग सोड्याचा वापर पदार्थ बनवण्या व्यतिरिक्त कसा करता येईल

फ्लाॅवरमध्ये लपलेले किडे खूप धोकादायक असतात. म्हणून फ्लाॅवरची भाजी करण्याआधी तो नीट स्वच्छ करणे गरजेचे असते.

फ्लाॅवर धुण्यासाठी प्रथम, एक मोठे भांडे घ्या आणि ते पाण्याने भरा. लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिसळा. नंतर, या पाण्यात फुलकोबी घाला आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे सर्व कीटक निघून जातील आणि फ्लाॅवर आतून स्वच्छ होईल.

फ्लाॅवर स्वच्छ करण्याची ही पद्धत सर्वात सोपी आणि प्रभावी आहे. यासाठी, एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात मीठ घाला. त्यात फ्लाॅवर घालावा. ५-७ मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने स्वच्छ धुवा. मीठाचे पाणी देखील कीड काढून टाकते.

झेंडूचे फूल आहे सौंदर्यासाठी वरदान, आता घरीच मिळेल पार्लरसारखी चमक

फ्लाॅवर स्वच्छ करण्यासाठी आणि त्यातील किड काढून टाकण्यासाठी व्हिनेगरचा वापरही तितकाच गरजेचा ठरतो. याकरता एक मोठे भांडे पाण्याने भरा आणि १ चमचा व्हिनेगर घाला. त्यात फ्लाॅवर बुडवावा, त्यानंतर २-३ मिनिटांनी, ते पाणी काढून टाकावे आणि स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा. व्हिनेगरमध्ये आम्लयुक्त गुणधर्म असतात, यामुळे फ्लाॅवरमधील किडे बाहेर येण्यास मदत होते.

फ्लाॅवर गरम पाण्यात उकळून देखील स्वच्छ करू शकता. हे करण्यासाठी, एका भांड्यात पाणी उकळवा आणि उकळत्या पाण्यात फ्लाॅवर घालावा. काही सेकंदातच फ्लाॅवरमधील किड बाहेर येईल. उकळत्या पाण्यात मीठ देखील घालू शकता.