
1 कंपनीचे ऑफर लेटर किंवा अनुभव पत्र हरवल्यास काय करावे हे अनेकांना कळत नाही. बरेच जण असे झाल्यानंतर प्रचंड मानसिक त्रासातून जातात.
2 ज्या कंपनीने तुम्हाला ऑफर लेटर किंवा अनुभव प्रमाणपत्र दिले, त्या कंपनीच्या एचआर विभागाशी संपर्क साधा आणि त्यांना पत्र हरवल्याची माहिती सांगा.
3 ऑफर लेटरचा एक भाग म्हणून तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर किंवा इतर कागदपत्रे मिळाली असल्यास तुम्ही त्या कागदपत्रांच्या आधारे नवीन ऑफर लेटर एचआरकडे मागू शकता.
4 तुम्ही एचआरकडे ऑफर लेटरसाठी विनंती करणारा ई-मेलसुद्धा करू शकता. याआधी कंपनीशी झालेले बोलणे, ई-मेल किंवा पत्रव्यवहार आणि इतर आवश्यक माहिती सांगू शकता.
5 कंपनीच्या नियमांनुसार, अनुभव पत्र देणे हे कंपनीचे कर्तव्य आहे. जर कंपनीने पत्र देण्यास नकार दिला तर तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊ शकता.






























































