सिबिल स्कोर कमी झाला तर…

तुमचा सिबिल स्कोअर कमी झाला, तर कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते. कारण बँका कर्ज देण्यापूर्वी तो तपासतात. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास हळूहळू सिबिल सुधारतो.

सिबिल स्कोअर ठरावीक कालावधीनंतर तपासायला हवा. त्यात समस्या आढळल्यास काही गोष्टींची काळी घेऊन सिबिल स्कोअर सुधारता येऊ शकतो.

ईएमआय, क्रेडिट कार्डचे बिल वेळेत न भरणे किंवा इतर पेमेंट वेळेत न केल्यास सिबिल स्कोर कमी होतो. त्यामुळे सर्व पेमेंट वेळेत होतील, याची काळजी घ्या.

क्रेडिट कार्ड मर्यादेच्या 30 टक्क्यांपेक्षा कमी वापराचा प्रयत्न करा. क्रेडिट कार्डचा अतिवापर टाळा. एकाच वेळी अनेक कार्ड वापरणे टाळा तसेच अर्जदेखील एकाच वेळी करू नका.

तुम्ही कोणाचे सह-अर्जदार असाल, तर त्यांच्या हप्त्यांकडे लक्ष द्या. कारण त्यांच्या थकबाकीचा परिणाम तुमच्या स्कोअरवर होतो. तसेच स्वतःदेखील जास्त कर्ज घेण्याचे टाळा.