
- विमा पॉलिसी काही कारणास्तव बंद पडली असेल, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसीने दोन महिन्यांचे विशेष अभियान राबवण्याची घोषणा केली आहे.
- एलआयसीचे हे विशेष अभियान 1 जानेवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत चालवले जाईल. या मोहिमेत सर्व ‘नॉन-लिंक्ड’ पॉलिसींचा समावेश करण्यात आला आहे.
- विशेष मोहिमे अंतर्गत, पुन्हा सुरू करण्यायोग्य सर्व ‘नॉन-लिंक्ड’ योजनांच्या विलंब शुल्कात 30 टक्केपर्यंत सूट दिली जाणार आहे. ही सूट 5,000 रुपये पर्यंत मर्यादित असेल.
- विशेष म्हणजे मायक्रो इन्शुरन्स पॉलिसीधारकांना विलंब शुल्कात 100 टक्के सूट देऊन त्यांना पूर्ण दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांचा दिलासा मिळेल.
- ज्या पॉलिसींचा प्रीमियम भरण्याचा कालावधी संपलेला नाही आणि ज्या पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वी बंद झाल्या आहेत, त्या या मोहिमे अंतर्गत पुन्हा सुरू करता येतील.


























































