
मोबाईल अचानक हँग झाल्यास पॉवर बटण आणि आवाज कमी करण्याचे बटण एकाच वेळी दाबून ठेवा. फोन व्हायब्रेट होईल आणि ऑटोमॅटिक रिस्टार्ट होईल.
त्यामुळे पह्न सुरू झाल्यावर रिसेंट अॅपवर क्लिक करा आणि सर्व अॅप्स एकाच वेळी बंद करा. तसेच फोनचे स्टोरेज 90% पेक्षा जास्त भरल्यास फोन हँग होतो.
गॅलरीमधील अनावश्यक व्हिडिओ, पह्टो आणि व्हॉट्सअॅपवरील कचरा डिलीट करा. गुगल प्ले स्टोअरमधून सर्व अॅप्स आणि सेटिंगमधून सॉफ्टवेअर अपडेट करा.
सेटिंग्समध्ये अॅप पर्याय निवडा. त्यात क्रोम इंस्टाग्रामसारख्या जास्त वापरल्या जाणाऱ्या अॅप्सवर क्लिक करून स्टोरेजमध्ये जा आणि ण्त ण्aम्प करा.
क्लिअर कॅशेनंतर अॅप्समध्ये पुन्हा लॉगीन करावे लागू शकते. जर फोन सतत हँग होत असेल तर महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेऊन पह्न फॅक्टरी रिसेट करा.























































