व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम होणार एकत्र, मार्क झुकरबर्ग यांचे संकेत

555

सोशल मेसेजिंग अॅप्लिकेशन असं म्हटलं तर तीन अॅप्लिकेशन्स डोळ्यासमोर येतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम. सोशल शेअरिंग हा महत्त्वाचा घटकही या तीन अॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट आहे. आता हीच तीन अॅप्स एकत्र होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत या तिन्ही अॅप्लिकेशन्सना एकत्र केलं जाईल, अशी माहिती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.

हे तिन्ही अॅप्स एकत्र झाल्यानंतर फेसबुक मेसेंजरने इन्स्टाग्रामवर आणि इन्स्टाग्रामवरून व्हॉट्सअॅपवर मेसेज करू शकतील. फेसबुकने व्हॉट्सअॅप हे इन्स्टंट मेसेज शेअरिंग अॅप्लिकेशन टेकओव्हर केलं होतं. त्यानंतर व्हॉटसअॅपमध्ये बाय फेसबुक असं लिहून आलेलं पाहायला मिळालं होतं. तसेच, व्हॉट्सअॅपचं स्टेटस फेसबुकवरही शेअरही करता येणं शक्य झालं आहे.

तसंच, व्हॉट्सअॅप फ्रॉम फेसबुकद्वारे जे युजर्स नवीन रजिस्ट्रेशन करतील त्यांना फेसबुकचे व्हिडीओ कॉलिंग डिव्हाईसची सुविधा उपलब्ध होईल. या डिव्हाईसमधील स्टोरी टाईम या फीचरद्वारे युजर्स फेसबुक अकाउंट नसतानाही व्हिडीओ कॉलिंग करू शकतील. या तिन्ही सोशल प्लॅटफॉर्मवरील चॅट इन्स्क्रिप्शन्समध्ये तसे बदल करण्यात येणार आहेत. ते बदल हे तिन्ही अॅप्लिकेशन एकत्रित झाल्यानंतर दिसून येतील.

आपली प्रतिक्रिया द्या