
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नव्या फिचर्सवर सतत काम करत असते. आता व्हॉट्सअॅप आपल्या युजर इंटरफेसमध्ये बदल करणार असल्याची माहिती आहे. WaBetaInfo ने याबाबत माहिती दिली असून एक स्क्रिनशॉटदेखील शेयर केला आहे. स्क्रिनशॉटमध्ये दाखवण्यात आलं आहे की, ज्या वेळी हे फिचर लाँच केलं जाईल त्या वेळी नवं चॅट कसं दिसेल…
आता व्हॉट्सअॅप चॅट एका लाईनद्वारे सेपरेट केले जातात. नवं अपडेट आल्यानंतर दोन चॅटमधल्या लाईन्स हटवल्या जातील. अँड्रॉईड युजर्ससाठी व्हॉट्सअॅपचं हे अपडेट बिटा वर्जनमध्ये उपलब्ध आहे. आयफोन युजर्ससाठी हे अपडेट कधी उपलब्ध होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. WaBetaInfo एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. यात व्हॉट्सअॅपवर लेटेस्ट आणि आगामी येणाऱया फिचर्सबाबत सांगितलं जातं. अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठीचे अपडेट यावर शेअर केले जातात.

























































