WhatsApp Chats सुरक्षित ठेवायची आहे? मग फॉलो करा ‘या’ स्टेप्स…

जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तुम्हालाही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग मेसेज सुरक्षित ठेवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हला व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

chat backups करा बंद

जर तुम्हाला वाटत असेल की, चॅटिंग बॅकअप घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स एन्क्रिप्टेड एंड-टू-एंड ठेवायचे असल्यास खाली दाखवल्या प्रमाणे स्टेप्स फॉलो करा.

1. व्हॉट्सअ‍ॅप सुरु करा. नंतर उजवीकडे दिसणार्‍या तीन डॉट मेनूवर क्लिक करा आणि सेटिंग्जवर जा.
2. सेटिंग्जवर गेल्यानंतर चॅट्स ऑप्शनमध्ये तुम्हाला WhatsApp Chats Backup ऑप्शन दिसेल.
3. यानंतर Google Drive Settings ऑप्शनमध्ये बॅकअप टू गूगल ड्राईव्ह पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला पाच पर्याय दिसतील. नेव्हर, Only when I tap Back up , डेली, विकली आणि मंथली. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे पर्याय निवडू शकता.

फिंगरप्रिंट लॉक

आपला मोबाईल फोन दुसऱ्या व्यक्तीच्या हातात पडला तर आपले चॅटिंग मॅसेज वाचले जाण्याची भीती असते. त्यामुळे चॅटिंग आणखी सुरक्षित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ‘फिंगरप्रिंट लॉक’ नावाचे नवे फीचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने ट्युमही तुमचे चॅट्स मेसेज सुक्षित ठेवू शकता.

1. ‘फिंगरप्रिंट लॉक’ फीचरसाठी सेटिंगमध्ये जाऊन अकाऊंट पर्याय निकडा, त्यानंतर प्रायव्हसी पर्यायावर क्लिक केल्यावर फीचर अॅक्टिव्ह करता येईल.
2.या फीचरमध्ये ऑटोमॅटिकली लॉकसाठी तीन पर्याय असणार आहेत. यातील पहिला पर्याय म्हणजे तातडीने लॉक करण्याचा, दुसरा पर्याय एक मिनिटानंतर आणि तिसरा पर्याय 30 मिनिटांनंतर लॉकचा असेल.

आपली प्रतिक्रिया द्या