व्हॉट्सअॅप… सात दिवसानंतर मेसेज आपोआप डिलिट होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपप्रेमींनो, जरा इकडे लक्ष द्या! व्हॉट्सअॅपवरील मेसेज आता तुम्हाला डिलिट करण्याची गरज पडणार नाही. ते सात दिवसानंतर आपोआप डिलिट होणार आहेत. लवकरच हे नवे फीचर व्हॉट्सअॅपमध्ये रिलीज होणार आहे.

‘डिसअॅपीरींग मेसेजेस’ असे ही फीचर असणार आहे. ते एकदा इनेबल केले की मेसेजेस सात दिवसानंतर आपोआप डिलिट होतील. त्यामुळे यूजर्सना त्यांना आलेले मेसेजेस हे सात दिवसांच्या आत पहावे लागतील. नाहीतर ते डिलिट होतील. मेसेज डिलिट झाल्यानंतरही पाहता यावेत यासाठी ते गायब होण्यासाठीच बॅकअप घ्यावा लागेल. जेणेकरून ते मेसेजेस गुगल ड्राईव्हवर पाहता येऊ शकतील.