पापा मेरे पापा! व्हॉट्सऍपकडून ‘फादर्स डे’चे गिफ्ट

कोणत्याही खास दिवशी सोशल मीडियावर स्टिकरच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा ट्रेंड आहे. उद्या 20 जून रोजी फादर्स डे आहे. या दिवसाचे औचित्य साधून क्हॉट्सऍपने आपल्या युजर्ससाठी स्टिकर्स लाँच केले आहे. ‘पापा मेरे पापा’ असे या स्टिकर पॅकला नाव देण्यात आले आहे. त्यामुळे व्हॉट्सऍप युजर्सला फादर्स डेच्या शुभेच्छा खास स्टिकरच्या माध्यमातून देता येतील.

‘पापा मेरे पापा’ स्टिकर पॅक सर्वात आधी हिंदुस्थान आणि इंडोनेशिया येथे लाँच करण्यात आले. ज्या देशांमध्ये वडिलांना ‘पापा’ असे संबोधतात, तिथे हे फिचर रोलआऊट करायचे असे ठरले होते. मात्र आता याला जागतिक स्तरावर लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे. सध्या अँड्रॉईड आणि आयओएसकर स्टिकर पॅक रोलआऊट केले आहे. यासाठी व्हॉट्सऍपवर जाऊन चॅटिंग सुरू करायचे. त्यानंतर स्टिकर आयकॉनवर टॅप केल्यावर स्टिकर गॅलरी येईल. त्यात ‘पापा मेरे पापा’ पॅक दिसेल.

आपली प्रतिक्रिया द्या