
WhatsApp लवकरच व्हॉइस मेसेजेसला वेगवेगळ्या प्लेबॅक स्पीडमध्ये प्ले करण्याचे फीचर अॅड करण्याची शक्यता आहे. सध्या यूझर्स रिसीव्ह झालेल्या व्हॉइस मेसेजला केवळ नॉर्मल स्पीडमध्ये चेक करू शकतो. नव्या फीचरमध्ये व्हॉइस मेसेजेसला स्लो किंवा फास्ट स्पीडमध्ये ऐकू शकू.
WABetaInfo ने या अपकमिंग फीचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की यूझर्सला तीन प्लेबॅक स्पीड ऑप्शन्स मिळतील. त्यामध्ये 1.0X, 1.5X आणि 2.0X असे पर्याय आहेत. हे फीचर सरळ उपलब्ध होईल. यासाठी तुम्हा स्टेप्स फॉलो कराव्या लागणार नाही. तुम्हाला एखादा मेसेज रिसीव्ह झाल्यावर प्लेबॅक स्पीड बटन आपोआप अॅड करण्यात येईल.
रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार व्हॉट्सअॅप लोवर प्लेबॅक स्पीड सपोर्ट देखील प्राप्त होईल, मात्र ते लोकांसाठी दिले जाणार नाही. त्यामागे काही खास कारण नाही. नवीन फीचर अजून तयार होत आहे आणि iOS आणि अँड्रॉइड बीटा बिल्ड मध्ये उपलब्ध होईल. WABetaInfo ने दावा देखील केला आहे की, हे नवं फीचर पुढल्या आठवड्यापर्यंत अपडेट करण्यात येईल.
व्हॉट्सअॅप मल्टी-डिवाइस सपोर्ट नावाच्या एका फीचरवर देखील काम सुरू आहे. कंपनी येणाऱ्या महिन्यांमध्ये ते या प्लॅटफॉर्मवर अॅड करू शकेल. रिपोर्टनुसार, iOS यूझर्स नंतर अँड्रॉइड व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप दोन वेगवेगळ्या पद्धतीचे मल्टी डिव्हाइस डेव्हलप करत आहेत. एकाने मेन फोनला इंटरनेटसोबत कनेक्ट केल्याशिवाय व्हॉट्सअॅप वेबचा उपयोग करू शकतो. दुसऱ्यातून तुम्ही मेन व्हॉट्सअॅप अकाउंट चार वेगवेगळ्या डिव्हाइससोबत कनेक्ट करू शकाल.
याशिवाय कंपनी ‘Encrypted Chat Backup’ फीचर देखील आणू शकते. व्हॉट्सअॅप चॅट्स आधीपासूनच एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात. मात्र, या चॅट्सचा बॅकअप थर्ड पार्टी अॅप गूगल ड्राइववर बनते. अशावेळी व्हॉट्सअॅप नवे एन्क्रिप्टेड चॅट बॅकअप ऑप्शन आणण्याची तयारी करत आहे. यामुळे यूझर्सची प्रायव्हसी टिकेल आणि अकाउंट हॅक होण्यापासून वाचेल.

























































