व्हॉईस मेसेज सेंड करण्याआधी ऐकता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की सातत्याने व्हॉट्सऍपवर नवनवीन फीचर येत असतात. युजर्सला व्हॉट्सऍप वापरणे सुलभ जावे, हा त्यामागील हेतू आहे. आताही कंपनीने नवे फीचर आणले आहे. त्यामुळे कोणताही व्हॉईस मेसेज सेंड करण्यापूर्वी आपल्याला तो ऐकता येणार आहे.

सध्या आपल्याला व्हॉट्सऍपवर कुणाला व्हॉईस मेसेज पाठवायचा असेल तर माईक बटण दाबन ठेवून आवाज रेकॉर्ड करावा लागतो. बटण सोडल्यानंतर व्हॉईस मेसेज ‘ऑटोमेटिकली’ जातो. परंतु नवे फीचर आल्यानंतर युजर्सना आपला मेसेज पाठवण्यापूर्वी ऐकता येईल. त्यासाठी व्हॉट्सऍप आपल्या ऍपमध्ये एक रिह्यू बटण जोडणार आहे. यावर टॅप केल्यावर व्हाईस मेसेज ऐकता येईल. त्यानंतर मेसेज पुढे पाठवायचा की नाही, हे आपण ठरवू शकू. मागील अनेक दिवसांपासून व्हॉट्सऍप प्लेबॅक स्पीडवर काम करत आहे. या फीचरमुळे व्हॉईस मेसेज वेगाने किंवा कमी वेगाने ऐकणे शक्य होईल.