
देशाच्या अनेक भागांमध्ये सध्या उन्हाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. अनेक शहरांमध्ये दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणेदेखील अवघड झालेय. तरीही लोकांना काम-धंद्यानिमित्त बाहेर पडावे लागतेच. कडक उन्हातील एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यात घामाने चिंब भिजलेला हा मुलगा निरागसपणे असे काही बोलतोय की, कुणालाही हसू येईल. तो म्हणतोय, ‘‘आम्ही मुलं रोज या 42 डिग्री कडक उन्हात घामानं भिजून शाळेत जातो. कृपया आमच्यासारख्या मुलांवर थोडी दया करा, नाहीतर आम्ही आजारी पडू. जेव्हा मी पंतप्रधान होईन, तेव्हा मी उन्हाळ्यात शाळेत जाण्यावर पूर्णपणे बंदी घालीन.’’
























































