अत्याचाऱ्यांना फाशी देणारा ‘शक्ती कायदा’ कधी अमलात आणणार? अनिल देशमुख यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारने बनवलेल्या ‘शक्ती कायद्यात महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. केंद्र सरकारने अद्याप त्या कायद्याला मंजुरी दिलेली नाही.

लाडक्या खुर्चीसाठी काम करणारे मिंधे सरकार लाडकी बहीण आणि तिच्या लाडक्या लेकींवरील अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून हा ‘शक्ती कायदा’ कधी अमलात आणणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केला.