
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील कपसेठी गावात राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्या पत्नीची हत्या केली. या घटनेत त्याच्या दोन मित्रांचाही सहभाग आहे. क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीचे भांडण विकोपाला गेल्यामुळे ही हत्या झाल्याचे कारण पोलिसांनी सांगितले आहे.
आजमगढ येथील महिला रूमना आणि तिचा नवरा अर्जुन सिंह उर्फ बंटू सिंह या दोघांचेही नेहमी भांडण होत असे. पत्नी रूमनाला स्वयंपाक करता येत नसे शिवाय ती तिच्या नवऱ्याचे म्हणणे ऐकत नसे. यामुळे पती अर्जुन नेहमी दु:खी असायचा. पत्नी स्वयंपाक करत नाही, या कारणामुळे नाराज असलेला अर्जुन सिंहने एक दिवस मित्रांच्या मदतीने बायकोचा काटा काढायचा असे ठरवले. याकरिता त्याचा मित्र दीपक गुप्ता आणि चंद्रकेश यादव यांच्या मदतीने बायको रूमनाचा खून केला.
या घटनेची नोंद वाराणसी येथील कपसेठी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे. याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक सूर्यकांत त्रिपाठी यांनी सांगितले की, 5 जून रोजी वाराणसी येथील कपसेठी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. आरोपींनी खुनासाठी वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. आरोपी पती आणि त्याचा साथीदार दीपक याला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा साथीदार चंद्रकेश यादव फरार आहे.
मृत महिला रुमना आणि तिचा पती अर्जुन सिंह हे आझम गढचे रहिवासी आहेत. पत्नीची हत्याने करण्यासाठी त्याने तिला बाईकवरून जौनपूर येथील सराय पोलीस स्थानक परिसरातील दीपक गुप्ताच्या पिठाच्या गिरणीत आणले. तेथे त्याने पत्नीला विष मिसळून पाजले. यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने उशीने तिचे तोंड दाबले. यामुळे रुमनाच मृत्यू झाला. रुमनचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह त्याने आजमगढ येथील सराईमेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहिरीत फेकून दिला.
पत्नी रुमना नवऱ्याचे ऐकत नसे आणि स्वयंपाकही करत नसे, यामुळे संतापाच्या भरात नवऱ्याने तिची हत्या केली. या हत्यामागे अजूनही इतर कारण असू शकते, पण आरोपीने त्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
























































