पुण्यात पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या, पतीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात  पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पती दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असे, तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव आणत असे. या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि स्वाती यांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. लग्नानंतर रोहित स्वातीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. त्याशिवाय दारूसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी छळ करीत होता. शारिरीक व मानसिक छळास कंटाळून पत्नी स्वातीने 4 जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. डी. सोनवणे तपास करीत आहेत.