स्कूटर चालवण्याची पत्नीची होती इच्छा, पतीने केला खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना ऑनलाईन । लुधियाना

पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात पत्नीने स्कूटर शिकण्याचा आग्रह धरला म्हणून पतीने तिचा खून केला आहे. पोलिसांनी  या प्रकरणी पती अर्जून कुमार आणि सासू मंजू देवी यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जूनची पत्नी करीना हिने आपल्या पतीकडे स्कूटर खरेदी करण्याचा आणि शिकवण्याचा आग्रह धरला होता. याचाच राग धरून अर्जूनने आपल्या आईसोबत करीनाचा खून केला.

करीनाच्या मृत्यूबाबत तिच्या मावशीला संशय वाटल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावर कारवाई करत पोलिसांनी शनिवारी करीनाच्या पती आणि सासूला अटक केली आहे. दीड वर्षापूर्वी अर्जून आणि करीनाचा प्रेम विवाह झाला होता. हा विवाह अर्जूनच्या आईला मान्य नव्हता. २८ ऑगस्ट रोजी अर्जूनच्या आईने एक स्कूटर विकत घेतली आणि दोघांना घरी बोलावले. त्यानंतर करीनाने अर्जुनकडे स्कूटर चालवण्याचा आग्रह धरला. पण करीनाने स्कूटर चालवणे अर्जूनला मान्य नव्हते. पण करीनाने स्कूटर शिकण्याचा तगादा लावला. त्यावर चिडून अर्जूनने आपल्या आईसोबत मिळून करीनाचा खून केला. करीनाचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह फासावर चढवला आणि तिने आत्महत्या केल्याआ कांगावा केला. पण करीनाच्या शवविच्छेदनानंतर तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अर्जून आणि आईला अटक केली आहे.