पतीला डोश्यातून दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर गळा दाबून केली हत्या

1773
file photo

तमिळनाडूमधील पुझाल येथे प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. महिलेने सर्वप्रथम पतीला डोश्यातून झोपेच्या गोळ्या दिल्या. तो बेशु्द्ध होताच तिने प्रियकराच्या मदतीने त्याची गळा दाबून हत्या केली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून ती त्याच्याशेजारी रात्रभर झोपली. सकाळी उठल्यावर तिने पतीचा अतिदारु पिल्याने मृत्यू झाल्याचा कांगावा केला. पण पोस्टमार्टेममध्ये त्याची हत्या झाल्याचे समोर आले. अनुप्रिया (22) असे आरोपी महिलेचे नाव असून सुरेश (23) असे तिच्या मृत पतीचे नाव आहे. तर मुरासोली मारन (22) असे प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी, अनुप्रिया आणि तिच्या प्रियकराला अटक कऱण्यात आली आहे.

अनुप्रियाचे लग्न सुरेशबरोबर 2014 साली झाले होते. त्यांना चार वर्षांचा मुलगाही आहे. सुरेश एका मटणाच्या दुकानात कामाला होता. तर अनुप्रिया एका मेडीकल दुकानात काम करते. तिचे मुरासोली या तरुणाबरोबर अनैतिक संबंध होते. यादरम्यान, अनुप्रियाचे रोज रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर चॅटींग करणे सुरेशला आवडत नव्हते. यावरुन त्यांच्यात वाद होत असे सुरेशने अनु्प्रियाला मारहाणही केली होती. यामुळे अनुप्रियाने पतीचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानंतर तिने सुरेशला रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकलेला डोसा दिला. सुरेशने तो खाल्ला त्यानंतर त्याची शुद्ध हरपली. नंतर अनुप्रियाने आणि मुरासोलीने गळा दाबून सुरेशची हत्या केली.

सुरेशचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर मुरासोली निघून गेला तर अनुप्रिया काहीही घडल नसल्याचा आव आणत सुरेशच्या शेजारी झोपली. सकाळी उठल्यावर तिने शेजाऱ्यांना जमा केले व अति दारु प्यायल्याने सुरेशचा झोपेत मृत्यू झाल्याचा कांगावा केला. त्यावेळी शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी सुरेशचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. त्यात सुरेशचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अनुप्रियाला व मुरासोलीला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या