
कोल्हापूरात पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव (ता.करवीर) रविवारी पहाटे गवा दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राधानगरी अभयारण्यात आढळणारे गवे आतापर्यंत आसपासच्या गावात भरकटल्याचे दिसुन येत होते. मात्र, आता गवा औद्योगिक वसाहतीतही दर्शन देत आहेत.
तामगाव-गोकुळ शिरगाव तलाव आणि एमआयडीसीच्या मागील बाजूने हा गवा सकाळी सहाच्या सुमारास कागले मळा या रहिवाशी परिसरात घुसला. सरपंच महादेव पाटील यांनी माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस व वन विभागाने कर्मचारी दाखल झाले. बिथरलेल्या गव्याला ऊसाच्या शेतातून ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

























































