असलदे येथे गवारेड्यांमुळे शेतीचे नुकसान; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कणकवली तालुक्यातील असलदे गावठणवाडी येथे गवारेड्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. या गव्यांमुळे भातशेती आणि काजूबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने गवारेड्यांचा बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होण्याची भीती आहे. त्यामुळे असलदे येथे गवारेड्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा,अशी मागणी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी केली आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी या गवारेड्यांनी असलदे गावात मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला होता. त्यानंतर स्थानिकांनी यासंबंधी वनविभागाला माहिती दिली. पण त्यानंतर कोणतीच उपायोजना झाली नसल्याने पुन्हा गवारेड्यांनी शेतामध्ये येत शेतीचे नुकसान केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. या गवरेड्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त वन खात्याने नाही केला तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.