हा फक्त सुरूवातीचा कल; संध्याकाळपर्यंत बहुमत मिळवू, भाजप नेत्याचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 200 हून अधिक  जागांवर आघाडी घेताना दिसत आहे. तर भाजप 78  जागांवर आघाडीवर आहे. पण हा सुरूवातीचा कल असून आम्ही बहुमत मिळवू असा विश्वास भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी व्यक्त केला आहे. तसेच बंगालमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल असा दावाही त्यांनी केला आहे.

News 18 hindi ने याबबत वृत्त दिले आहे.  कैलाश विजयवर्गीय पश्चिम बंगालचे प्रभारी आहेत. ते म्हणाले की संध्याकाळपर्यंत भाजप बहुमताचा आकडा गाठेल. बंगालमध्ये भाजपचेच सरकार स्थापन होईल असा दावा त्यांनी केला आहे. तसेच गेल्या निवडणूकीत भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपने चांगली कामगिरी केली असेही विजयवर्गीय यांनी नमूद केले.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार सध्या तृणमूल 202 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 78 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्येही भाजप पिछाडीवर असून अवघ्या 4 जागांवर आघाडी मिळाली आहे.