जालन्यात लॉकडाऊनपूर्वीच मद्यपीं वाईन शॉपसमोर गर्दी, रांगेत उभे राहून केली दारु खरेदी

740

जालना शहरात आज मध्यरात्रीपासून संचार बंदी लागू करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच मद्यपींनी आज सकाळपासून वाईनशॉपच्या रांगेत उभे राहून शिस्तबध्दपणे दहा दिवसांचा दारुचा कोटा फूल करुन घेतला.

जालना शहरात कोरोना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याने ही साखळी रोखण्यासाठी  जालना प्रशासनाच्या वतीने आज मध्यरात्रीपासून पुढील दहा दिवस जालना शहरात लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. या अगोदरच्या लॉकडाऊनच्या अनुभवानंतर मद्यपीने येणार्‍या दहा दिवसांची दारु खरेदी करण्यासाठी जालना शहरातील विविध ठिकाणच्या वाईनशॉपवर सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.मद्यपींनी आज सकाळपासून वाईनशॉपच्या रांगेत उभे राहून शिस्तबध्दपणे दहा दिवसांचा दारुचा कोटा फूल करुन घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या