पुण्यात गोदामाची भिंत पाडून 13 लाखांची वाईन चोरली, सासवड रस्त्यावरील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात गोदामाची भिंत पाडून चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांची तब्बल 12 लाख 65 हजारांची वाईन चोरली आहे. 6 ते 8 ऑगस्टदरम्यान पुणे-सासवड रस्त्यावरील श्रीनाथ वेअर हाउसमध्ये ही घटना घडली. फिर्यादी संतोष केशवे (वय 33, रा. शेवाळवाडी ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.

पुणे- सासवड रस्त्यावर वाइन इन्टरप्रायझेज प्रा. लि. श्रीनाथ वेअर हाउसिंग गोदाम आहे. संतोष हे या गोदामाचे मॅनेजर आहेत. चोरट्यांनी 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान गोदामाची भिंत पाडून वेगवेगळ्या कंपनीचे वाईन बॉक्स, डिव्हीआर असा एकूण 12 लाख 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.