
हिवाळ्याच्या दिवसांत थंड किंवा गरम पाण्याने आंघोळ करताय तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. थंडीच्या दिवसात अति गरम आणि अतिथंड पाण्याने आंघोळ करत असाल तर ते आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. यासाठी थंडीच्या दिवसात आंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करणे योग्य आहे. या दिवसात आपल्या हृदयाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोमट पाणी शरीराला अचानक धक्का देत नाही आणि ते शरीराचे तापमान कायम ठेवतं. कोमट पाण्याने शरीराचे तापमान तसेच ठेऊन रक्तभिसरण सुरळित करण्यास मदत करतं. याबाबत मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयाच्या कार्डिओलॉजिस्ट डॉ. करुण बहल सांगतात की, जेव्हा आपण थंड पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा पटकन शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होते आणि आपलं हृदय देखिल वेगाने धडधडायला लागतं, थरथरल्यासारखे होते आणि हृदयावर दबाव येतो. तर अनेक अभ्यासात आढळून आले आहे की, हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मेटाबॉलीजम, रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होते. ही गोष्ट लक्षात ठेवता अनेक फिटनेस प्रेमी हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करण्यास पसंती देतात. मात्र ते हे विसरुन जातात की याप्रकारच्या चाचण्यांमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त असलेली लोकं सहभागी होतात. ज्यांना कोणत्या प्रकारचा आजार नसतो.
डॉ.बहल यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करतात तेव्हा हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्याने आपले हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते. अशाचप्रकारे थंडीच्या दिवसात अचानक गरम पाणी अंगावर घेतल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळेही हृदयावर ताण येतो. हिवाळ्याच्या दिवसात आंघोळ करण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करणे केव्हाही चांगले असते. आंघोळीची सुरुवात आपल्या पायांवर पाणी घेऊन करावी. पुढे डॉ.बहल सांगतात की, थंडीत हृदय विकाराच्या धोका कमी करण्यासाठी हलका आहार घ्यायला हवा. त्यामुळे या दिवसात उबदार कपडे घालावेत. नियमित व्यायाम करावा आणि बरं वाटत नसल्यास वेळच्यावेळी औषधे घेणं. कधी-कधी या वातावरणात उच्च रक्तदाब असलेल्यांनी औषधांची गरज असते. त्यामुळे कायम हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

































































