
बर्याच वेळेला आपण घरून निघताना पाकिट किंवा डेबिट कार्ड विसरतो. तेव्हा ATM मधून पैसे काढण्यास मोठी अडचण होते. आता डेबिट कार्डशिवाय पैसे काढणेही शक्य आहे.
- सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरील बँकेच्या ऍपमध्ये लॉग इन करा.
- त्यात Card less Cash पर्यायावर क्लिक करा
- तुम्हाला जेवढी रक्कम काढायची आहे ती रक्कम ऍपमध्ये नमूद करा.
- ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी क्रमांक येईल.
- नंतर बँकेच्या एटीएममध्ये जा.
- तिथे एटीएममध्ये Card less Cash पर्यायावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला मोबाईल क्रमांक विचारला जाईल.
- आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर आलेला ओटीपी टाकायचा आहे.
- हा ओटीपीची वैधता 15 मिनिटांसाठी असते.
- हा ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही ऍपमध्ये नमूद केलेली रक्कम तुम्हाला मिळेल.
- या सुविधेचा विशेष फायदा असा की जर तुमच्या जवळच्या व्यक्तीला तातडीने रोख रक्कम हवी असेल तर या सुविधेचा वापरत करता येईल.
- ही सुविधा सध्या SBI, ICICI, Kotak Mahendra, Bank of Baroda, RBL Bank या बँकांमध्ये उपलब्ध आहे.
- प्रत्येक बँकेची ही सुविधा त्यांच्या ऍप प्रमाणे बदलत असते.































































