
तुम्हाला एटीएम मशीनमधून पैसे काढायचे आहेत, पण तुम्ही डेबिट कार्ड घरी विसरला आहात… काही हरकत नाही. कारण आता डेबिट कार्डविना एटीएममधून रक्कम काढता येणार आहे. सरकारी क्षेत्रातील ‘बँक ऑफ बडोदा’ने नुकतीच ग्राहकांनी ही आनंदवार्ता दिली आहे. ‘बँक ऑफ बडोदा’ने इंटरऑपरेबल कार्डलेस पॅश विथड्रॉवल (आसीसीडब्ल्यू) ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना ‘बँक ऑफ बडोदा’च्या एटीएममधून यूपीआयद्वारे रोख रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे डेबिट कार्ड नसतानाही रक्कम काढता येईल.
- एटीएममधून यूपीआयच्या मदतीने रोख रक्कम काढण्याची सुविधा देणारी ‘बँक ऑफ बडोदा’ ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे.
- या सेवेच्या माध्यमातून ग्राहक एका दिवसात फक्त दोन वेळा रक्कम काढू शकतील. याचा अर्थ एका दिवसात दोन व्यवहारांद्वारे 10 हजार रुपयेच काढता येणार आहे.
- ही सेवा ‘बँक ऑफ बडोदा’च्या ग्राहकांपुरतीच मर्यादित आहे.




























































