दुचाकीस्वार तरूणीला पाडून मोबाइल हिसकाविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरात मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. अशीच एक घटना विमानतळ रस्त्यावर घडली असून दुचाकीस्वार तरूणीला धक्का देत खाली पाडून तिच्याकडील मोबाईल हिसकावून नेण्यात आला. याप्रकरणी तरूणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार तरूणी दुचाकीवरून लोहगावकडे निघाली होती. त्यावेळी विमानतळ रस्त्यावर चोरट्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. तरूणीच्या दुचाकीला धक्का देउन खाली पाडून हातातील मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करत आहेत. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून पादचाऱ्यासह नागरिकांचे मोबाइल हिसकावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेषतः रात्रीअपरात्री कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून मोबाईल चोरून नेले जात आहेत.