
पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी येथे कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. गुरुवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण कर्जत तालुक्यातील रहिवासी आहेत.
सुभद्रा बाळू रुपनर, राजेंद्र बाळू रुपनर आणि आरुष राजेंद्र रुपनर हे गंभीर जखमी झाले. तर लता काळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. कार संगमनेरकडून पुण्याकडे चालली होती तर आयशर टेम्पो संगमनेरच्या दिशेने येत होता. यादरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली.
धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अन्य चौघे गंभीर जखमी झाले असून कारचाही चक्काचूर झाला. घटनेची माहिची मिळताच डोळासने महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सालोमन सातपुते करीत आहे.