शेजारच्याची काच पुसणारा आवडला, घरकाम करणाऱ्याच्या प्रेमात पडलेली महिला गर्भवती झाली

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं या कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या गाजलेल्या कवितेतील ओळी आहेत. असं असलं तर सगळ्यांचं प्रेम काही सेम नसतं. काही प्रेमकहाण्या या हटके आणि भन्नाट असतात. ब्रिटनमध्येही अशीच एक प्रेमकहाणी फुलली. पहिल्या नजरेत तिला तो आवडला. तो काच पुसत होता आणि ती त्याला पाहात होती. पाहाता पाहाता ती त्याला पाहातच राहिली आणि मग त्यालाही ती त्याच्याकडे पाहताना दिसली, मग काय दोघांच्या नजरेतील प्रेम एकमेकांना कळाले आणि दोघे प्रेमात पडले.

36 वर्षांची गेमा स्टेपेहँसनला शेजारी राहणाऱ्यांच्या घराची काच साफ करताना एक माणूस दिसला. सीन नॉडवेलचं काम पाहून तिने सीनला कामासाठी घरी बोलवालयाचं ठरवलं होतं. खरंतर तिला पहिल्या नजरेतच सीन आवडला होता. गेमाने सीन याला एके दिवशी तिच्या घरी साफसफाईला बोलावला. घराची साफसफाई करता करता गेमा आणि सीन नॉडवेल हे एकमेकांच्या प्रेमात पडले. सीन आणि गेमा मोकळ्या वेळात गप्पा मारायला लागले. दोघांमधील मैत्री पक्की झाली आणि दोघांमध्ये प्रेमांकुरही फुलले.

साफसफाई करत असताना सीनने गेमाला वजनदार वस्तू उचलायला मदत केली. सीन हा खूप काळजी करणारा आहे असं त्यावेळी गेमाला वाटलं. त्याच्या याच गुणावर ती जास्त भाळली होती. गेमानेच अखेर त्याच्याकडे प्रेमाची कबुली दिली. त्यानेही झटक्यात हो म्हटलं आणि दोघांनी एकत्र नांदायला सुरुवात केली. गेमा आणि सीन यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार असल्याने दोघेही खूश आहेत. गेमा हिला पहिल्या प्रियकरापासून 2 मुलं आहेत. सीन हा विवाहीत असून त्याने पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेतला आहे.