सहकारी पुरुषाचा फोन गुपचूप तपासला, महिलेला बसला जबर धक्का

एकाच कंपनीमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय महिलेने आपल्या सहकर्मचारी माजी प्रियकराचा मोबाईल चोरुन चेक केला. मोबाईलच्या गॅलरीमध्ये तिने असं काही पाहीलं की ती नखशिखांत हादरली. यानंतर या महिलेने थेट पोलिसांत धाव घेत सहकाऱ्याची तक्रार केली.

कर्नाटकची राजधानी बंगळुरु मधील एका BPO मध्ये काम करणारी प्रिया (बदलेले नाव) हिचे तिच्याच ऑफीसमधील आदित्य संतोष सोबत प्रेमसंबंध होते. चार महिने ते एकत्र होते मात्र काही कारणांमुळे त्यांच्यात वाद झाला आणि ते वेगळे झाले. प्रियाला संशय होता की आदित्यच्या मोबाईलमध्ये तिचे व्हिडीओ आहेत. ते व्हिडीओ डिलीट करण्यासाठी तिने संधी साधत आदित्यचा मोबाईल तपासला होता, फोनची गॅलरी उघडताच तिला जबरदस्त धक्का बसला.

प्रियाने मोबाईलची फोटो गॅलरी उघडली असता त्यामध्ये 13,000 न्यूड फोटो होते. त्यामध्ये तिचे फोटो तसेच ऑफिस मधील अन्य महिला सहकर्मचाऱ्यांचे सुध्दा न्यूड फोटो होते. या घटनेची माहिती प्रियाने आपल्या वरिष्ठांना कळवली. यानंतर, बेलांदुर येथील बीपीओ (BPO) कार्यालयाच्या प्रमुखाने 23 नोव्हेंबर, रोजी सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी आदित्य संतोषला ताब्यात घेतले असून त्याचा फोन तपासला जात आहे. पोलिसांना संशय आहे की त्याने अश्लिल फोटोंच्या आधारे महिलांना ब्लॅकमेल केले असावे.