प्रबोधनकारांचं पुस्तक अधिकाऱ्यावर फेकलं, महाराष्ट्रात संतापाची लाट

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका अधिकाऱ्याने त्याच्या सेवानिवत्तीच्या कार्यक्रमात भेटवस्तू म्हणून सहकाऱ्यांना प्रबोधनकारांचे पुस्तक वाटले. या गोष्टीचा राग आलेल्या एका महिलेने पुस्तकावरून त्या अधिकाऱ्याशी वाद घालत ते पुस्तक त्याच्याच अंगावर फेकले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम हे दोन दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तके वाटले. त्यावरून एका महिलेने रुग्णालयात राजेंद्र कदम यांच्याशी वाद घातला. त्यानंतर तिने तिला मिळालेले ते पुस्तक कदम यांच्या अंगावर भिरकावले व तिथून निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.