
फोन आणि मेसेजला प्रतिसाद देत नसल्याने तरुणीची सोशल मीडियावरून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
पीडित तरुणी ही जोगेश्वरी परिसरात कुटुंबीयांसोबत राहते. तिला काही दिवसांपासून एक तरुण सतत फोन आणि मेसेज करायचा. त्या त्रासाला ती कंटाळली होती. अखेर तरुणीने त्याला फोनवर ब्लॉक केले. ब्लॉक केल्याने त्याने तरुणीचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड करून तिची बदनामी केली. फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्याचे समजताच तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या लेखी तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी विनयभंग आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. लवकरच ओशिवरा पोलीस त्या तरुणाचा जबाब नोंद करून पुढील कारवाई करणार आहेत.
























































