
कौटुंबिक वादातून आईने दोन पोटच्या मुलांना पेटवून आत्महत्या केली. यात तिघांचाही मृत्यू झाला आहे. आई दीक्षा व सिंचा, धनंजय अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कलबुर्गीत आज ही घटना घडली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कलबुर्गी जिल्ह्यातील मडियाळ गावात विवाहितेने दोन मुलींसह आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
कलबुर्गीतील स्टेशन बझार परिसरात राहणाऱ्य़ा दीक्षा यांचे कौटुंबिक वाद होते. यातून तिने मुलगी सिंचा (वय 2), मुलगा धनंजय (वय 3) या दोघांना रॉकेल ओतून पेटवून दिले. जीवाच्या आकांताने ही मुले ओरडत होती. मात्र, तिने दोघांना बांधून ठेवले होते. यानंतर तिने स्वतः अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात तिघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी स्टेशन बझार पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.


























































