नोकरीसाठीच्या मुलाखतीत दिली मजेदार उत्तरे….तरीही मिळाली नोकरी….वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीला खूप महत्त्व असते. या मुलाखतीचा तणावाखाली अनेकजण शेवटच्या क्षणापर्यंत वाचन करत असतात. मुलाखतीतील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आपल्याला यायला हवे, असा प्रत्येकाचा हेतू असतो. अनेकदा योग्य उत्तरे माहिती असूनही अनेकजण मुलाखतीत भांबावून जातात. नोकरी मिळण्यासाठी मुलाखत हा महत्त्वाचा टप्पा असतो. तरीही मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची मजेदार आणि अफलातून उत्तरे देऊनही एका महिलेला नोकरी मिळाली आहे. याचा किस्सा तिने शेअर केला आहे.

ही महिला टिकटॉकर असून तिचे नाव कर्टनी आहे. ती एका ठिकाणी मुलाखतीसाठी गेली होती. त्या मुलाखतीदरम्यान मजेदार घटना घडल्या. तिने या मुलाखतीचा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला आहे. याला तुफान प्रतिसाद मिळाला असून त्याला 230,000 पेक्षा जास्त व्हूज मिळाले आहेत. मुलाखतीत आपल्याला कामाच्या तासाबाबत किती लवचिकता दाखवू शकतात, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आपण रोज शीर्षासन करत असून आपले शरीर खूप लवचिक आहे, असे उत्तर दिले. यासारख्या अशा काही प्रश्नांनाही आपण अशीच उलटसुलट सुचतील, तशी उत्तरे दिल्याचे कर्टनीने सांगितले.

आपल्याला आरोग्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्हाला पाठीच्या मणक्यांचा काही त्रास आहे का, तुम्ही किती वर्कलोड घेऊ शकता असे प्रश्न होते. आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम केले असून तिथे आपण वजनदार बॅरेलही उचलल्या आहेत, असे उत्तर आपण दिले. आपण अशा प्रकारे उत्तरे दिल्याने ही नोकरी आपल्याला मिळणार नाही, याची खात्री झाली. मात्र, आश्चर्यकारकरित्या ही नोकरी आपल्याला मिळाल्याने कर्टनीने सांगितले.

कर्टनीने शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आपण स्वतः रिक्रूटर असून अनेकजणांची मुलाखत घेतो. मात्र, असा अनुभव आपल्याला कधीही आलेला नाही. तुमचा अनुभव जाणून घेतल्यानंतर मलाही मुलाखतीदरम्यान असे कोणी भेटले तर काय, असा प्रश्न सतावत असल्याचे एका यूजरने म्हटले आहे.

पुढच्यावेळी मी तुम्हाला माझ्याकडे नोकरीसाठी मक्की घेईन, अशा व्यक्ती आपल्याला आवडतात. योग्य-अयोग्य विचार न करता प्रश्नाला उत्तर देणे महत्त्वाचे असल्याचे दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे. अनेकांनी तिला या नोकरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रतिक्रियांना कर्टनीने स्माईली देत रिप्लाय केला आहे.