तोकडे कपडे घालून प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेली, वेटरने दाखवला बाहेरचा रस्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोकडे कपडे घालून हॉटेलमध्ये गेलेल्या एका महिलेला वेटरने हॉटेलमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ही घटना ऑस्ट्रेलियातील एका समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलमध्ये घडली.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मार्टिना कोरॅडी असं या महिलेचं नाव आहे. मूळची इटलीची रहिवासी असलेली ही महिला ऑस्ट्रेलियातील बोंडी या प्रसिद्ध बीचवर गेली होती. बीचवर फिरून झाल्यानंतर ती तिथल्या एका हॉटेलमध्ये गेली. तिच्यासोबत तिचा प्रियकरही होता.

हॉटेलमध्ये जाताना तिने एक करड्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची ट्राउझर घातली होती. ते दोघंही हॉटेलमध्ये गेले आणि एका टेबलवर बसले. तेवढ्यात तिथे एक महिला वेटर आली आणि तिने मार्टिनाला हॉटेलमधून जायला सांगितलं. कारण, मार्टिनाने घातलेले कपडे तोकडे असल्याने अशा प्रकारच्या कपड्यांना हॉटेलमध्ये परवानगी नसल्याचं तिने सांगितलं.

या प्रकारावर मार्टिना आणि तिचा प्रियकर थक्क होऊन पाहत राहिले. त्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तोवर या संभाषणात हॉटेलचा मॅनेजरही डोकावला. त्याचंही हेच म्हणणं होतं की, मार्टिनाचे कपडो तोकडे आणि हॉटेलमध्ये अयोग्य आहेत. त्यामुळे तुम्ही इथून निघून जावं, असं तो मार्टिनाला म्हणाला.

ही घटना मार्टिना हिने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शेअर केली. तिच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आता कोरोनामुळे हॉटेल्स ओस पडली आहेत, तिथे अशा क्षुल्लक कारणावरून ग्राहकाला बाहेरचा रस्ता दाखवणं योग्य नाही. या पोस्टवर नेटकऱ्यांनीही हॉटेल प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. ड्रेसकोडची मागणी कार्यालय अथवा तत्सम ठिकाणी पाळणं समजू शकतो, पण बीचवरील हॉटेलमध्ये ड्रेसकोड ठेवणं चुकीचं असल्याचं काहींचं म्हणणं आहे.