मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा  प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयात  आज एका महिलेने  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रूपा मोरे असे या महिलेचे नाव असून तिसऱया मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी तिला तात्काळ अडविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रूपा मोरे या मध्यमवयीन महिलेने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱया मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला.तिच्या सोबत तिची  दोन मुलेही होती. शीव येथील त्यांच्या एसआरए इमारतीतील घराबाबतच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला  तिसऱया मजल्यावरून  खाली उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या रूपा मोरे यांना बंदोबस्तावरील पोलिसांनी तात्काळ रोखले. रूपा मोरे यांना नंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

मंत्रालयात यापूर्वीही आत्महत्यांचे प्रयत्न झाले आहेत. धर्मा पाटील या 84 वर्षीय शेतकऱयाने याआधी 2018 मध्ये मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यांचा नंतर उपचारादरम्यान मत्यू झाला होता. 2018 मध्येच हर्षल रावते या 45 वर्षीय व्यक्तीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपविले होते. त्यानंतर मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर सुरक्षा जाळी लावण्यात आली आहे.