उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू, तीन जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन सामना |उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. लीना गंगवाणी ४० असं मृत महिलेचे नाव असून जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रविवारी चार वाजल्याच्या सुमारास उल्हासनगरमधील कुर्ला कॅम्पच्या मुरलीवाला कॉम्प्लेक्स मधील दुसऱ्या मजल्यावरील स्लँब कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जर्जर झालेल्या इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.