महिला टी-20 चॅलेंज, तीन संघांची घोषणा; हरमन, स्मृती, मितालीकडे नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयने रविवारी महिला टी-20 चॅलेंज या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. सुपरनोवास संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे, ट्रेलब्लेझर्स संघाचे नेतृत्व स्मृती मंधानाकडे तर वेलोसिटी संघाचे नेतृत्व मिताली राजकडे सोपवण्यात आले. ही स्पर्धा 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 9 नोव्हेंबरला पार पडेल.

सुपरनोवास संघ
हरमनप्रीत (कर्णधार), जेमिमा (उपकर्णधार), चमारी, प्रिया, अनुजा, राधा, तानिया, शशिकला, पूनम, शकीरा, अरुंधती, पूजा, अयूषी, अयाबोंगा, मुस्कान.

ट्रेलब्लेझर्स संघ
स्मृती (कर्णधार), दीप्ती (उपकर्णधार), पूनम, रिचा, हेमलता, नूझहात, राजेश्वरी, हर्लिन, झुलन, सिमरन, सलमा, सोफी, नथ्थाकन, डिएंड्रा, काशवी.

वेलोसिटी
मिताली (कर्णधार), वेदा (उपकर्णधार), शफाली, सुषमा, एकता, मानसी, शिखा, देविका, सुश्री, मनाली, पॅस्पेरेक, डॅनियल, लूस, जहानआरा, अनघा.