
‘सोशल मीडियाचा सामाजिक कार्यासाठी वापर’ या विषयावर विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन उद्या, रविवारी दुपारी 3.45 वाजता गोरेगाव पश्चिमेच्या आरे रोड येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे करण्यात आले आहे. उत्तरदायित्व फाऊंडेशन, केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि समन्वयच्या वतीने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. अशोक राजवाडे, संदीप बर्वे, अॅड. हृषिकेश चव्हाण, गंधार निगुडकर, रमेश कुरुडे, सुनील डिमेलो आदी उपस्थितांना मार्गदर्शन करतील.