रशियावर 4 वर्षासाठी कठोर निर्बंध, टोकियो ऑलिम्पिक व फुटबॉल विश्वचषकाला मुकणार

वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी (वाडा)ने सोमवारी रशियावर 4 वर्ष बंदीचा कारवाई केली आहे. याचा अर्थ रशिया पुढील चार वर्ष कोणत्याही प्रकारच्या मुख्य स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी जपानमध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक आणि 2022 मध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकामध्ये रशियाला भाग घेता येणार नाही. रशियासाठी हा मोठा धक्का आहे.

रशियाने डोपिंगविरोधी प्रयोगशाळेद्वारे चुकीचे आकडे दिल्याला आरोप वाडाने केला आहे. त्यामुळे वाडाने कठोर कारवाई करत रशियावर चार वर्षांची बंदी घातली आहे. रशिया पुढील चार वर्ष प्रमुख स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे ऑलम्पिक, फुटबॉल विश्वचषकासह अन्य मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच आपली छाप सोडणारा रशियाचा संघ आता या स्पर्धांमध्ये दिसणार नाही. रशियासह त्यांच्या खेळाडूंसाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे.

वाडाच्या प्रवक्त्यांनी याबाब माहिती देताना सांगितले की, स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी रशियावर घालण्यात आली आहे. ज्या रशियन खेळाडूंना डोपिंगमध्ये क्लिन चिट देण्यात येईल ते तटस्थ झेंड्याखाली खेळू शकतात असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, वाडाच्या या निर्णयाविरोधात रशिया पुढील 21 दिवसामध्ये अपील करू शकतो. तसे झाल्यास हे प्रकरण कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAG) कडे पाठवण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या