कंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड

55

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

कंगाल पाकिस्तानला जागतिक बँकेने झटका दिला आहे. जागतिक बँकेशी संबंधीत इंटरनेशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इंवेस्टमेंट डिस्प्यूट्स (आयसीएसआयडी) अर्थात गुंतवणूक विवादांशी संबंधीत आंतरराष्ट्रीय केंद्राने पाकिस्तानला 97 कोटी डॉलरचा (600 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. बलुचिस्थानमधील रेको डिक खाणीचा करार रद्द केल्याने पाकिस्तानला हा दंड ठोठावण्यात आला आहे. यातील 4.08 अरब डॉलर दंड, तर 1.87 अरब डॉलर व्याज आहे.

जागतिक बँकेने सुनावलेली दंडाची रक्कम पाकिस्तानला टेथयान कॉपर कंपनीला (टीसीसी) द्यावी लागणार आहे. आर्थिक संकटात असणाऱ्या पाकिस्तानचासाठी हा मोठा झटका आहे. याच संबंधी चौकशीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक समिती स्थापन केली आहे. तसेच पाकिस्तान सरकार या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?
टीसीसीने बलुचिस्तानमधील रेको डिकमध्ये मोठ्या प्रमाणात सोने आणि तांबे असल्याचा शोध लावला होता. यासाठी कंपनीने 22 कोटी डॉलर खर्च केल्याचा दावा केला होता. परंतु 2011 मध्ये पाकिस्तानने कंपनीला खोदकामासाठी जमिन देण्यास नकार दिला. करारामध्ये गडबड असल्याचे सांगत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने हा करार रद्द केला होता. यानंतर टीसीसी कंपनीने 2012 मध्ये जागतिक बँकेच्या आयसीएसआयडीकडे पाकिस्तानविरोधात 11.43 अरब डॉलरचा दावा ठोकला होता. 2017 मध्ये आयसीएसआयडीने टीसीसीचा दावा योग्य ठरवला होता, परंतु त्यावेळी दंडाची रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती. आता हा निर्णय देण्यात आला असून, आयसीएसआयडीचा हा निर्णय पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या