
कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेत हिंदुस्थानमध्ये रुग्णसंख्येत अतिशय वाढ होत असून ऑक्सीजन रेमडेसिविर आणि लशीच्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहून जगभरातील अनेक देशांनी हिंदुस्थानला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
आतापर्यंत अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, चीन, पाकिस्तान, सिंगापूर, युएई या देशांनी हिंदुस्थानला मदत करण्याचे धोरण जाहीर केले आहे एवढेच नव्हे तर या देशांनी त्यासाठी सक्रीय पुढाकारदेखील घेतला आहे. हिंदुस्थानमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला असून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन देत यामुळे हिंदुस्थानला कोरोनाविरोधातील युद्ध लढण्यासाठी मदत मिळू शकेल, असा सूर जागतिक पटलावर उमटू लागला आहे.
हिंदुस्थानात कोरोनाच्या दुसर्याट लाटेत मोठ्या संख्येने रुग्ण आणि मोठ्या संख्येने मृत्यू होऊ लागले आहेत. देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड यांचा जाणवू लागला असून व्यापक लसीकरण मोहिमेमुळे लसींचाही तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातल्या अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला असून यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून शत्रुत्व निभावणाऱ्य़ा चीन आणि पाकिस्तानचादेखील समावेश आहे.
व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सलिवन यांनी ट्वीट केले की, हिंदुस्थानातील करोना रुग्णवाढीची अमेरिकेला चिंता वाटू लागली आहे. आम्ही भारताला मदत पुरवण्यासाठी 24 तास काम करत आहोत.
Spoke today with National Security Advisor Ajit Doval about the spike in COVID cases in India and we agreed to stay in close touch in the coming days. The United States stands in solidarity with the people of India and we are deploying more supplies and resources: pic.twitter.com/yDM7v2J7OA
— Jake Sullivan (@JakeSullivan46) April 25, 2021
अमेरिकेचे गृहमंत्री अँटनी ब्लिंकन यांनीदेखील ट्विट केले की हिंदुस्थानातील लोकांसाठी आणि तिथल्या आरोग्य सेवकांसाठी आम्ही वेगाने अतिरिक्त मदत पाठवणार आहोत.
Our hearts go out to the Indian people in the midst of the horrific COVID-19 outbreak. We are working closely with our partners in the Indian government, and we will rapidly deploy additional support to the people of India and India’s health care heroes.
— Secretary Antony Blinken (@SecBlinken) April 25, 2021
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी, या लढ्यामध्ये फ्रान्स तुमच्या सोबत आहे. असे ट्वीट केले आहे. तर युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्लस मायकेल यांनी, युरोपियन संघ हिंदुस्थानसोबत या लढ्यामध्ये उभा आहे. हिंदुस्थानला मदतीबाबत 8 मे रोजी होणार्या हिंदुस्थान – युरोप परिषदेत आम्ही चर्चा करू, असे म्हटले आहे.



























































