
देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत आहे. देशातील 10 टक्के लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीच्या 65 टक्के म्हणजे दोन- तृतीयांशपेक्षा अधिक हिस्सा आहे. तर खालच्या 50 टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या फक्त 6.4 टक्के हिस्सा आहे. वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट 2026 नुसार, हिंदुस्थानात आर्थिक विषमता जास्त आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब खूपच गरीब आहेत. आकडेवारीवरून असे दिसून येतंय की हिंदुस्थानातील 1 टक्के लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीचा 40.1 टक्के वाटा आहे, जो 1961 नंतर सर्वात जास्त आहे. अर्थज्ञ नितीन कुमार भारती, लुकास चँसल, थॉमस पिकेटी आणि अनमोल सोमांची यांनी या अहवाल लिहिला आहे. त्यांच्या मते हिंदुस्थान हा सर्वाधिक आर्थिक विषमता असलेल्या देशांपैकी एक आहे.
महिलांची परिस्थिती जैसे थे
कामगार क्षेत्रात महिलांचा वाटा 15.7 टक्के एवढा कमी आहे. मागील 10 वर्षांत त्यामध्ये कोणताही सुधार झालेला नाही. उत्पन्न, संपत्ती आणि लिंग या मुद्यांवर आहे आर्थिक विषमतेचा डोलारा उभा आहे, हेच अहवालातून अधोरेखित होते.
वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट 2026मध्ये काही हिंदुस्थानातील आर्थिक विषमतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच काही सल्लेही देण्यात आले आहेत. 10 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या संपत्तीवर 2 टक्के वार्षिक कर आणि 10 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या संपत्तीवर 33 टक्के वारसा कर लावावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.



























































