जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा; नीतू, स्वीटी, निकहत यांची पदके पक्की

नीतू घंघास, स्वीटी बुरा व निकहत झरीन या हिंदुस्थानी खेळाडूंनी जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील आपली पदके पक्की केली आहेत. या तिघींनीही उपांत्य फेरीत धडक दिली असून सुवर्णपदकांपासून त्या केवळ दोन पावले दूर आहेत.

नीतू घंघास हिने 48 किलो गटातील उपांत्यपूर्व लढतीत जपानच्या मदोका वाडा हिला आरएसीद्वारे पराभव केला. आरएसी म्हणजे रेफ्रीने मध्येच लढत थांबवून विजयी घोषित करणे. नीतूने लागोपाठ तिसऱया लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूला आरएसीद्वारे पराभूत केले. नीतूपुढे स्पर्धेत एकाही प्रतिस्पर्धी बॉक्सरने तग धरला नाही. स्पर्धेतील तिचा फॉर्म बघता नीतूकडून देशवासीयांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. मागील तीनही लढती आरएससी पद्धतीने जिंकल्यामुळे नीतूचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. शिवाय प्रतिस्पर्धी खेळाडूवरही तिच्या धडाकेबाज खेळाचे दडपण असेल.

स्विटी बुराने 81 किलो गटातील उपांत्यपूर्व लढतीत व्हिक्टोरिया केबिकावा हिचा 5-0 फरकाने पराभव करीत आगेकूच केली. या चुरशीच्या लढतीत पाचपैकी चार पंचांनी प्रत्येकी 29ः28 असा स्विटीच्या बाजूने काwल दिला. एका पंचाने 30-27 असा काwल दिला. स्टार बॉक्सर निकहत झरीन हिने 50 किलो गटात थायलंडच्या रक्षत चुथमत हिचा 3-2 गुणफरकाने पराभव केला. अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारत निकहतने हिंदुस्थानचे तिसरे पदक पक्के केले.

‘गतवर्षी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. यावेळी राहिलेले ते अधुरे स्वप्न यावेळी पूर्ण करायचे आहे. हिंदुस्थानी संघाने घरच्या मैदानावर जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या इराद्यानेच तयारी केली आहे. शिवाय घरच्या मैदानावरील प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे लढतीत फायदाही होतो. त्यामुळे अशा अनुकूल परिस्थितीत सुवर्णपदकावर मोहर उमटविण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावीन.’

नीतू घंघास