Video – उंची फक्त 3 फूट 4 इंच, मात्र बॉडीबिल्डिंगमध्ये बनवला वर्ल्ड रेकॉर्ड…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधी काळी लोक बुटका म्हणून हिणवत होते, आज त्याच पठ्याने जागतिक विक्रम केला आहे. 3 फूट 4 इंच उंची असलेल्या या तरुणाचे नाव आहे प्रतीक विठ्ठल मोहिते. प्रतीकला अनेकांनी त्याच्या उंचीवरून हिणवलं, मात्र त्याने आता असं काही करून दाखवलं आहे की, त्याला बुटका म्हणून हिणवणारे आज त्याला डोक्यावर घेत आहेत.

जगातील सर्वात कमी उंचीच्या बॉडीबिल्डरमध्ये (World’s Smallest Bodybuilder) प्रतिकचा समावेश करण्यात आला आहे. 3 फूट 4 इंच उंची असणाऱ्या प्रतिकने आपल्या एका मित्राच्या सांगण्यावरून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदणीसाठी अर्ज पाठवला होता. प्रतीकच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने यूट्यूबवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये बॉडीबिल्डर प्रतीक मोहिते त्याच्या दिनचर्या आणि व्यायामाची पद्धत यावर बोलताना दिसत आहे. व्हिडीओत प्रतीक म्हणाला आहे की, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणे हे माझे स्वप्न होते. मी ते जिंकल्याबद्दल खूप आनंदी आहे. माझ्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे.’