वरळी सिलिंडर स्फोटातील जखमी मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

वरळी बीडीडी चाळ नंबर-3 मध्ये मंगळवारी सकाळी गॅस सिलिंडर स्फोटात गंभीर जखमी झालेल्या चार वर्षीय चिमुरडय़ाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पुरी कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. या जखमींपैकी मंगेश पुरी (4 महिने) या चिमुरडय़ाचा मंगळवारी रात्री कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला.

वरळी कामगार वसाहत, बीडीडी चाळ नंबर-3 मधील एका घरात गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत आनंद पुरी (27), विद्या पुरी (25), विष्णू पुरी (5 वर्षे), मंगेश पुरी (4 महिने) एकाच कुटुंबातील हे चौघे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या चौघांपैकी तिघांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र एका मुलाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जखमींपैकी एकाची प्रकृती अजूनही गंभीर आहे.