वरळीत मोबाईल चोरणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या

डंपर चालकाचा मोबाईल चोरणे एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना रविवारी वरळी येथे घडली. मोबाईल चोरल्यानंतर पळून गेलेल्या त्या तरुणाला चार ते पाच जणांनी पकडून त्याची हत्या केली. वरळी पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.

वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एस.के. अहिरे मार्गावर एक तरुण मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच एपीआय भगवान चौधरी, अंमलदार स्वप्नील डेरे, स्वप्नील माने हे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्या तरुणाची बांबू तसेच सळईने मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता हत्येचा प्रकार स्पष्ट झाला. पोलिसांनी लगेच एकाला अटक केली. त्यानंतर थोडय़ाच वेळाने अन्य तिघांना अटक केली.

सागर खारवी (22) असे त्या मृतकाचे नाव असून तो प्रभादेवी परिसरात राहत होता. सागरने रविवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळी उभ्या असलेल्या डंपर चालकाचा मोबाईल चोरून पळ काढला होता. हा प्रकार कळताच चालकाने अन्य चौघांना सोबत घेऊन सागरला पाठलाग करून पकडले. त्यानंतर त्याला तेथे असलेल्या विजेच्या खांबाला बांधून बांबू व सळईने जबर मारहाण केली. त्यात सागरचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या