वरळीच्या सिक्रेड हार्ट शाळेबाहेर पुन्हा गतिरोधक बसवणार, युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
worli-sacred-heart-school-speed-breaker-reinstalled-yuvasena-aaditya-thackeray-success-update

वरळीतील डॉ. हर्डीकर मार्गावर असलेल्या सिक्रेड हार्ट शाळेसमोरील काढलेले गतिरोधक पुन्हा बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. रस्त्याच्या कामादरम्यान गतिरोधक काढण्यात आले होते. मात्र त्यानंतर अपघातांचे प्रमाणात वाढ झाल्याने विद्यार्थी व पालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. युवासेनेच्या पाठपुराव्याला हे यश मिळाले आहे.

रस्ता दुरुस्तीच्या कामादरम्यान रस्त्यावरील गतिरोधक काढल्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढले होते. रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनले होते. भरधाव वाहनांमुळे शाळा भरताना किंवा सुटल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना जीव मुठीत धरून हा रस्ता ओलांडावा लागत होता. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा गतिरोधक बसविण्यात यावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी शाळा व पालकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी महापालिकेचे रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता स्वामी यांची भेट घेत निवेदन दिले होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन, प्रमुख अभियंता स्वामी यांनी तत्काळ गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिले आहे.